शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पहलगाम इथे झालेल्या भ्याड हल्याचा निषेध…!

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पहलगाम इथे झालेल्या भ्याड हल्याचा निषेध…!

गांधी चौक मुल येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण

मुल –

शिवसेनेचे प्रमुख नेते
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशानुसार पूर्व विदर्भसंघटक किरण भैया पांडव व विधानसभा आमदार व पक्ष सचिव मनीषा ताई कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादीनी केलेल्या भ्याड हलयाचा आज शिवसेना महिला आघाडी मुल जिल्हा चंद्रपुर तर्फे गांधी चौक मुल येथे जाहिर निषेध करण्यात आला मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली देण्यात आली, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंद्रपुर भारतीताई राखडे, यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. याठिकाणी प्रामुख्याने उपस्थित महिला आघाडी तालुकाप्रमुख, शालीनीताई खैरे,उपतालुका प्रमुख वंदनाताई टिकले,शाखा प्रमुख साधना नामेवार,माधुरी बलगेलवार,शालु उराडे,अपेक्षा वंगलवार,शितल कंदीकुरवार,रिना बगडे ,रंजना बगडे तसेच युवासेना उपतालुका प्रमुख आशिष भाऊ टिकले,सुनील राखडे,संजय खैरे,आदींची उपस्थिती होती..