देवनिल विद्यालय टेकाडीचा उत्कृष्ट निकाल सुयोग गजानन वसाके ९५.६०% गुण घेऊन तालुक्यात प्रथम

देवनिल विद्यालय टेकाडीचा उत्कृष्ट निकाल
सुयोग गजानन वसाके ९५.६०% गुण घेऊन तालुक्यात प्रथम

विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित देवनिल विद्यालय टेकाडी येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२५ चा घवघवीत यश संपादित केले असून याहीवर्षी विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. सुयोग गजानन वसाके याने ९५.६०% गुण घेऊन मुल तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला तर विद्यालयातुन द्वितीय क्रमांक प्रथमेश मार्कंडी गोहणे ८३.६०%, तृतीय क्रमांक भुवन सुनिल कोटरंगे ७८.४०% ,चतुर्थ क्रमांक प्रवज्जा मुकेश रामटेके ७५.८०% आणि पाचवा क्रमांक अनुष बंडु सोनुले ७४.४०% प्राप्त केला.परीक्षेला बसलेल्या एकुण विद्यार्थ्यांपैकी प्राविण्य प्राप्त ४, प्रथम श्रेणी १५, व्दितीय श्रेणी २२ आणि उतिर्ण श्रेणीत १० विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माजी आमदार देवरावजी भांडेकर, उपाध्यक्षा डॉ . स्मिता भांडेकर, सचिव डॉ.महेश भांडेकर, मुख्याध्यापक राजेश सावरकर, सरपंच कालीदास खोब्रागडे, उपसरपंच योगेश लेनगुरे, माजी सरपंच डॉ.गजानन चौधरी,बंडु कोटरंगे यांच्यासह पालक गजानन वसाके, बंडु सोनुले,मार्कंडी गोहणे, सुनिल कोटरंगे, मुकेश रामटेके, प्रमोद नागोसे तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹