विश्वशांती विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल. निकालाची पंरपरा ह्या वर्षी सुध्दा राखली

विश्वशांती विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल. निकालाची पंरपरा ह्या वर्षी सुध्दा राखली
✒️✒️ जितेन्द्र बोरकर सावली प्रतिनिधि ✒️✒️
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालयातून कुमारी भाग्यश्री डुमाजी गंडाटे हिने ४५५(९१.००%) गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक तर तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकाविला असून द्वितीय क्रमांक कुमारी अश्विनी पुरुषोत्तम लाटेलवार ४५० (९०.००%) तर तृतीय क्रमांक आरती आनंदराव गोहणे ४३९(८७.८०%) पटकाविला आहे.तसेच मराठी माध्यमातून कुंदन अशोक पिठाले याने ३७४(७४.८०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला असून द्वितीय क्रमांक अनिशा मोहन जेगठे ३७२(७४.४०%) तर तृतीय क्रमांक विनम्र विलास गुरनुले ३६४(७२.००%) पटकाविला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यालयाचे एकूण २० विद्यार्थी प्राविण्य प्राप्त करून विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी तथा सदस्य विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.