भोकरे यांना धमकी देणाऱ्यांना अटक न केल्यास…
पत्रकार न्यायासाठी रस्त्यावर उतरतील.
_ राज्य उपाध्यक्ष प़ा. महेश पानसे.
चंद्रपूर:——
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे
डिजिटल मिडियाचे प़देशाध्यक्ष सिद्धाथॅ भोकरे यांना अज्ञात इसमाने
पत्र पाठवून जिवे मारण्याची धमकी
दिली याचा राज्यात सवॅ स्तरातून निषेध नोंदविला जात आहे. या अज्ञात इसमांना धडकून त्वरीत अटक करुन कायॅवाही न झाल्यास
पत्रकार बांधव खपवून घेणार नाहीत
व न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरतील असा इशारा राज्य पत्रकार
संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
प़ा. महेश पानसे यांनी दिला आहे.
‘ सिंदूर ऑपरेशन’ च्या
यशानंतर बॉलिवूड अभिनेते खान बंधू यांनी पाकिस्तानचा निषेध नोंदवून देशाप़ती आपला अभिमान
दाखवायला हवा होता, जेव्हा की पाकिस्तानी अभिनेत्यांनी पुढे येऊन
आपल्या देशाप़ती आपले प़ेम दाखविले. असे मत डिजिटल मिडिया राज्य अध्यक्ष सिद्धाथॅ भोकरे यांनी दि. १५ मे २०२५ ला
दैनिकातून व्यक्त केले होते.
या मत व्यक्तव्यानंतर अज्ञात
इसमाने निनावी पत्र पाठवून माफी
माग नाहीतर तुला उडवून देऊ अशी
धमकी दिली. या धमकी पत्रानंतर
पत्रकार बांधव संतापले असून संपुर्ण
राज्यात निषेध सत्र सुरू झाले आहे.
संपूर्ण राज्यात राज्यात तालुका, जिल्हा स्तरावर निवेदन देऊन धमकी
देणाऱ्यास त्वरित अटक व सिद्धाथॅ भोकरे यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी होत आहे. मागणी त्वरीत पुर्ण न झाल्यास राज्य पत्रकार संघाचे पत्रकार सदस्य राज्यात रस्तावर उतरतील असा इशारा
संघाचे प़देश उपाध्यक्ष प़ा. महेश पानसे यांनी दिला आहे.




