गुरूपौर्णिमेनिमित्त हार्दिक अभिवादन!
*गुरूपौर्णिमेनिमित्त पानसे सरांना चरणस्पर्श*
*प्रेरणादायी सार्थ शिकवण*
चंद्रपूर:- गुरुपौर्णिमा हा दिवस ज्ञानदेव गुरूंना आदरांजली अर्पण करण्याचा अनमोल पर्वणी मानला जातो. आषाढ पौर्णिमेच्या शुभदिनी शिष्य त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाचा आणि मार्गदर्शनाचा सन्मान करून आदर व्यक्त करतात.या महतदिनी, गुरुपौर्णिमेच्या पारंपरिक सणाच्या संदर्भात आमचे पत्रकारितेतील गुरू महेश पानसे सरांसाठी खास शुभेच्छा देत त्यांच्या अप्रतिम योगदानाचा गौरव केला जात आहे.
सरांना चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतो . सरांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! आपले मार्गदर्शन आणि शिकवण नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे.
आपल्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही, तरीही आपल्या प्रती अनमोल अशा भावना व्यक्त करतो.”
आपल्याप़ती असलेली कृतज्ञता
व्यक्त करायला शब्द तोटके पडतात.
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने, या शुभेच्छेत प़ामाणीक भावना दडलेली आहे. सरांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
महेश पानसे सरांच्या कार्याचा मान मोठा आहे.
त्यांचे मार्गदर्शन व शिकवण आपल्याला जितकी प्रेरणादायी तितकीच त्यांची माया, आपुलकी व ऋण अतुलनीय आहे.
आपले मार्गदर्शन आणि शिकवण नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे.
त्यांच्या शिकवणीमुळे जीवनातील अडचणींवर मात करण्याची हिम्मत मिळाली आहे,
गुरुंच्या शिकवणीमुळेच शिष्याला नवी दृष्टी ,नवा मार्ग प्राप्त होतो व जीवनात यशस्वी होण्याची ऊर्जा मिळते.
आणखी महत्वाचे म्हणजे *“आपल्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही,”*
गुरुंच्या उपकारांची कधीच फेड केली जाऊ शकत नाही, हिच आमची भावनीक अभिव्यक्ती. होत आमच्या शब्दातून गुरुची ऋणीभावना, त्यांच्याप्रतीट असलेली प्रेमपूर्ण कृतज्ञताच व्यक्त होईल. शिष्याने गुरूंचे ऋण मानून त्यांचा सन्मान करणे ही खरी गुरुपूजा असून, गुरुंच्या कृपेनेच जीवनात प्रगती होते व हे आमची अनुभूती आहे.
गुरूपौर्णिमा म्हणजे केवळ एक पारंपरिक सण नाही, तर गुरू आणि शिष्य यांच्यात भावनिक, आध्यात्मिक बंध दृढ करणारा एक दिवस. या दिवशी गुरूंचे केवळ शब्दांत आभार मानणे नव्हे तर त्यांच्या शिकवणीचा स्वताचे आचरणातून आदर करणे, त्यांच्या आदर्शांचा पाठपुरावा करणे हेच खरे गुरूपूजन ठरते.
गुरुपौर्णिमेची महती त्यांचे निव्वळ चरण स्पर्श करण्यापुरती मर्यादित नसून, गुरूंचे अमूल्य ज्ञान आत्मसात करून जीवनात रुजविणे ही खरी गुरुदक्षिणा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आपल्या मनातील प्रेम, आदर, श्रद्धा यांचे शब्दविन्यास हा या पर्वाचा सर्वोत्तम भाग ठरतो.
गुरूंच्या शिकवणीविना जीवन अंधारासारखे आहे, असाच विचार प्रत्येक शिष्याच्या मनात असतो. पानसे सरांसारखे गुरु जे आपले मार्गदर्शन करतात तेवढ्या प्रेरणादायक व्यक्तीला गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशी मनापासून शुभेच्छा !
शंकर बोरघरे
जिल्हा प्रतिनीधी ”
“लोकशाही ”
जिल्हा अध्यक्ष
*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ*




