सावली येथे साथ फाॅऊंडेशनव रोहित भाऊ बोम्मावार मित्र परिवार तर्फे दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

जय शितला माता गोविदा पथक चंद्रपूर ठरले प्रथम विजेता .

मुल – तालूका प्रतिनिधी

 

सावली येथे प्रथमच साथ फाॅऊंडेशन व रोहित भाऊ बोम्मावार मित्र परिवार तर्फे वतीने गोकुळ अष्टमी चे औचित्य साधून मंगळवार ला दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,या दहीहंडी चे जय शितला माता गोविंदा पथक चंद्रपूर यांनी १ लाख रुपये , ट्रॉफी प्रथम विजेता ठरले व जय श्री महाकाल गोविंदा पथक भंडारा ५१ हजार रुपये रोख द्वितीय क्रमांक पटकाविले,या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री रविंद्र शिंदे अध्यक्ष मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे अनेक मान्यवर उपस्थित होते ह्या दहीहंडी उत्सव कार्यक्रमाला प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मुंबई येथील प्रसिद्ध गायिका इशरत जहाँ व लावण्या वती आस्था वांद्रे उपस्थित होते, ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दहीहंडी स्पर्धेचे मुख्य आयोजक साथ फाॅऊंडेशन चे अध्यक्ष रोहित भाऊ बोम्मावार यांनी केले यावेळी त्यांनी साथ फाॅऊंडेशन च्या माध्यमातून भविष्यात होणाऱ्या कार्याची माहिती दिली,आज जशी सर्वांचीच साथ लाभली तशीच आपली नेहमीचीच साथ असु द्या असे आवाहन त्यांनी केले, यावेळी कार्यक्रमाचे संचालन एम.जे. आकाश व अंकिता यांनी केले, आभार प्रदर्शन साथ फाॅऊंडेशनच्या सचिव डॉ रुपाली रोहित बोम्मावार यांनी केले, ह्या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी साथ फाॅऊंडेशन व रोहित भाऊ बोम्मावार मित्र परिवार सावली परिश्रम घेतले, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे मोठी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हे विशेष.