मुल येथे तालुकास्तरीय वेटलिफ्टिंग क्रिडा स्पर्धेचे आयोजन .

मुल येथे तालुकास्तरीय वेटलिफ्टिंग क्रिडा स्पर्धेचे आयोजन .

क्रिडा क्षेत्रात आपले नावलौकीक करणारे हाकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्य

दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी  राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त तालुका क्रीडा संकुल मुल येथे, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक NIS कोच करण सुरेश कोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोबतच कार्यक्रमात तालुकास्तरीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा घेण्यात आली, या स्पर्धेत मूल तालुक्यातील विविध भागातून खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यात सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पमालार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत क्रीडा संकुल मुल येथे प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंनी विजय संपादन केला, या मध्ये   मुलांनी 61 किलो वजन गटात स्मित भसारकर, 67 किलो वजन गटात सोनल चन्नेकर, आणि 75 किलो ओपण वजन गटात श्रुंखल आंबटकर तर मुली मध्ये 44 किलो वजन गटात स्वरा गांगरेडिवार, 48 किलो वजन गटात श्रावणी आंबूलकर, 57 किलो वजन गटात तेजस्वी चौखूंडे आणि 57 किलो ओपन वजन गटात साचि लाकडे आशा एकूण सात खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकाविला. विजयी खेळाडूंना राष्ट्रीय कबड्डी पट्टू गुड्डू महाडोळे आणि BB हेअर सलून चे संचालक बंटी गारपेल्लीवार तर चंद्रपूर फॉरेस्ट डिपार्टमेंट चे PTI अमोल रामटेके यांच्या वतीने खेळाडूंना आकर्षक बक्षिस देण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून माजी dy Sp मधुकर वाढई सर, मुल तालुका क्रीडा संयोजक नामदेव पिजदुरकर सर क्रीडा शिक्षक ऊराडे सर, सोनवणे सर, अभिशेक सर सोबतच NIS कोच शार्विल देआरकर लाभले होते. खेळाडूंना क्रीडा क्षेत्राचे महत्व पठवून दिले गेले, आणि पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या