विज वितरण कंपनी ग़ाहकांना
” थ़ी फेज” झटका देण्याच्या तयारीत?
रोखठोक
***************
महेश पानसे.
एकाच परिसरात दोन किंवा
दोनपेक्षा अधिक विदयुत कनेक्शन
नाकारून सरसकट ” थ़ी फेज” विदयुत कनेक्शन देण्याचा डाव महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी
साधण्याच्या तयारीत असल्याचे संकेत चचैत असून असे झाल्यास
मोठा मानसिक व आथिंक फटका
बसणार असल्याचे चित्र आहे.
विदयुत पुरवठा अधिनियम
(2005) मधील उपशिषॅ क़.22.5
नुसार विज वितरण कंपनी आपला
‘पॉवर’ वापरणार असल्याची बाब पुढे येत आहे
वरील संदर्भिय विषयानुसार
विदयुत वापरकर्तास आता
अधिनियमानुसार एकाच परिसरात
विदयुत वापराकरिता दोन किंवा अधिक विदयुत मिटर नाकारण्यात
येणार आहेत. एकाच परिसरात घरेलू
व गैर घरेलू किंवा सामान्य वापराकरिता विदयुत वापरकर्तास
प्रत्येक उद्धेशाकरीता स्वतंत्र मिटरची
मागणी करावी लागेल मात्र एकाचे नावे एकच मिटर हे कंपनीचे धोरण
असणार आहे. यामुळे सर्व
साधारण विदयुत वापरकर्तास मोठा
त्रास व आथिंक भुदॅड सहन करावा लागणार आहे.
एकाच परिसरात/ इमारतीमध्ये
पिता- पुत्र किंवा दोन सख्खे भाऊ
वेगळे राहात असतील तर नवीन
नियमानुसार आवश्यकता असूनही
त्यांना आता स्वतंत्र विदयुत वापरकरीता वेगळा मिटर मिळणार
नाही व ही बाब त्रासदायक ठरणार
आहे.
भविष्यात विदयुत वापरकर्ते
या नवीन नियमांमुळे त्रस्त होण्याची
शक्यता वाढणार आहे. वेगळे स्वतंत्र
शिंगल फेज मिटर न देता एकाच परिसरात एकच थ़ी फेज मिटर
मंजूर करण्यात आल्यास स्थीर आकार, युनिट चे वाढीव दर व 100,200 युनिट नंतरचे चे भारी दर यातून
वापरकर्ते यांना मोठा आथिंक फटका बसेल.
इमारतीमध्ये एका पेक्षा अधिक ब्लॉक असतील तर दोन
मिटर नाकारून “थ़ी फेज ” ची
वाट विज वितरण कंपणी दाखवेल
तर ग़ाहकांना बसणारा झटका मोठाच असेल असे जाणकार
बोलताना दिसतात.





