ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल शाखेच्या वतीने कोहिनूर ऑफ इंडिया सन्मानित आमदार मुनगंटीवार यांचा सत्कार
मुल- धर्मेद्र सुत्रपवार
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांना नुकतेच कोहिनूर ऑफ इंडिया या उपाधीने सन्मानित करण्यात आले.या निमित्ताने ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा मूल यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या मूल तहसील चे अध्यक्ष राकेश ठाकरे यांनी संस्थेने केलेल्या कामाची आणि भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली.या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.आमदार मुनगंटीवार यांनी तत्कालीन ग्राहक संरक्षण मंत्री असताना केलेल्या कामाचा उल्लेख करताना ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या मूल शाखेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि येणाऱ्या काळात कठोर परिश्रम आणि समर्पणाने ही जनसेवा पुढे नेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमात भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, नंदकिशोर रणदिवे, प्रभाकर भोयर, मोतीलाल टहलियानी, पत्रकार बंधू आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहसचिव युवराज चावरे यांनी केले तर आभार सचिव मेहुल मणियार यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या सहसंघटक विवेक मांदाडे, सहसचिव हरीश हेडाऊ,कोषाध्यक्ष महेश गाजुलवार,प्रसिद्धि प्रमुख प्रशांत बोबाटे,सहप्रसिद्धि प्रमुख संतोष गाजुलवार,सूरज मांदाडे,सुनील कुकुड़कर तथा सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.




