भेजगाव केंद्रांतर्गत द्वितीय शिक्षण परिषद संपन्न
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडिसुर्ला येथे दिनांक 17 /9/ 2025 रोज बुधवारला भेजगाव केंद्रांतर्गत दुसरी शिक्षण परिषद आयोजित करण्यात आलेली होती. शिक्षण परिषदेचे उद्घाटन श्रीमाननिय श्रीरंग कुमरे, शिक्षण विस्तार अधिकारी बीट बेंबाळ यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून श्री. नवनीत कंदालवार, केंद्रप्रमुख केंद्र भेजगाव हे उपस्थित होते. श्री सुरेश टिकले उच्च श्रेणी मुख्याध्यापक गडीसुर्ला ,रत्नमाला गेडाम , फिस्कुटी,विलास बनसोड, वीरई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
तासिका 1
मा. दूरतकर मॅडम,पिंपरी दीक्षित
शैक्षणकी साहित्याचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेत प्रभावी वापर या विषयावर विविध साहित्याचा वापर कसा करायचा हे उदाहरणासहीत स्पष्ट केले.
तासिका 2
इंग्रजी rhymes चे गायन
कुमारी.बबिता बोबडे, फिस्कुटी यांनी अतिशय कृतीयुक्त पद्धतीने आणि सर्वांना एकत्रित करून सामूहिक रित्या शिक्षकांकडून गायन करून घेतले . कु. अर्चना लडके , वरारकर मॅडम आणि श्री.कोकोडे येरगाव यांनी देखील उत्कृष्ट रित्या कृतीयुक्त गायन करून सराव करून घेतला.
तासिका 3
Pat चाचणीच्या प्रश्नपत्रिकेवर चर्चा
श्री.उत्तम गोवर्धन, विरई पेठ यांनी प्रश्नपत्रिकेवर विस्तृत चर्चा घडवून आणली.प्रश्नाचे स्वरूप समजावून त्यावर कोणते अध्ययन अनुभव देता येईल यावर विस्तृत चर्चा झाली.
तासिका 4
शिष्यवृत्ती ,नवोदय परीक्षा मार्गदर्शन
श्री.भास्कर चौधरी ,सिंतला यांनी शिष्यवृत्ती तथा नवोदय परीक्षेत करिता विचारला जाणाऱ्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांना सराव कसा देता येईल यावरती त्यांनी खूप छान ट्रिक्स सांगितल्या. उपस्थित सर्व शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला.
तासिकेच्या दरम्यानच श्री चनफने संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल यांनी आकस्मिक भेट दिली.पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आणि मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा करिता जास्तीत जास्त परीक्षेला बसविण्याचा आग्रह केला आणि ग्रामीण भागातून जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र होतील तसेच नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होतील याकडे सर्व शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन केले.
शिक्षण परिषदेच्या अंतिम भागात श्री गजेंद्र कोपूलवार सेवानिवृत्त केंद्रप्रमुख केंद्र भेजगाव तसेच याच महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत असलेले श्री. प्रकाश निमगडे केंद्र मुख्याध्यापक भेजगाव आणि मा. गीता साखरे सहाय्यक शिक्षिका फिस्कुटी यांना या वर्षाचा जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाला या सर्वांचा सत्कार कुमारी जयश्री गुज्जनवार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुल यांचे हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री.विनोद कावळे,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती उपस्थित होते. या कार्यक्रमाला पंचायत समिती मुल अंतर्गत सर्व केंद्रप्रमुख सर्व बीआरसी विषय शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत कवासे विषय शिक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. शंकर चिचघरे मुख्याध्यापक पिपरी दीक्षित यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अविनाश श्रीगुरुवार. श्री विजय दुधे .श्री राजेंद्र चौधरी. कुमारी शितल धकाते सर्व शिक्षक वृंद गडीसुरला यांनी मेहनत घेतली.




