रुग्णांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आकाश येसनकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
मूल उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार *डायलिसिस सेंटर* — आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची घोषणा
मूल : प्रतिनीधी

देशगौरव पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या *सेवा पंधरवडा* अभियानांतर्गत मूल येथे आयोजित भव्य आरोग्य शिबिरात आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी डायलिसिस सेंटर सुरू होणार असल्याची घोषणा केली.
मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारे हे केंद्र लवकरच उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे कार्यान्वित होणार असून या निर्णयामुळे तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत तालुक्यातील रुग्णांना आठवड्यातून अनेकवेळा चंद्रपूर (४५ किमी) किंवा नागपूर (१५० किमी) येथे उपचारासाठी जावे लागत होते. या प्रवासामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत होते तसेच कुटुंबांवर आर्थिक भार वाढत होता.
हे केंद्र प्रत्यक्षात सुरू झाल्याने *४९ ग्रामपंचायती व ८४ महसुली गावे* थेट लाभक्षेत्रात येणार आहेत.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) चे शहराध्यक्ष आकाश येसनकर यांनी दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन सादर करून मागणी केली होती. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रा. अशोक उईके व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन देत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
यातच मूल उपजिल्हा रुग्णालयात आयोजित शिबिरात आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी *”एका महिन्याच्या आत डायलिसिस सेंटर सुरू होईल”* अशी अधिकृत घोषणा केली. त्यांच्या या भूमिकेमुळे रुग्णांना प्रत्यक्ष दिलासा मिळणार आहे.
आमदार मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रत्यक्ष घोषनेमूळे प्रत्यक्षात डायलिसीस सेंटर अस्तित्वात येत असल्यामुळे आकाश येनसकर यांनी समाधान व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री मा. प्रा. अशोक उईके आणि विशेषतः मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आकाश येसनकर यांनी विशेष आभार मानले आहे.




