उपजिल्हा रूग्णालयाला माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची भेट-

उपजिल्हा रूग्णालयाला माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची भेट
तात्काळ तज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याची केली मागणी

मूल -(प्रतिनिधी)

मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे मात्र तज्ञ डॉक्टरांअभावी अनेक रूग्णांना रेफर केल्या जात आहे, याबाबत माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना सदर माहिती होताच, मंगळवारी (7 ऑक्टोंबर) रोजी उपजिल्हा रूग्णाला भेट देवुन वैद्यकीय अधिक्षक डॉ. देवेंद्र लाडे यांचेशी चर्चा केली, यावेळी तज्ञ डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याची बाब समोर आली. यावेळी श्रीमती फडणवीस यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्याशी चर्चा करून डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याची मागणी केली.

मूल तालुक्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता तत्कालीन पालकमंत्री एकनाथराव गायकवाड यांच्या पुढाकारातुन सन 2005 मध्ये मूल येथे 50 खाटाचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रूग्णालय तयार करण्यात आले. दरम्यान उपजिल्हा रूग्णालयात तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून तज्ञ डॉक्टरांकडुन रूग्ण सेवा दिली जात होती. मात्र गेल्या अनेक वर्षापासुन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती मूल उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आलेली नाही, यामुळे रूग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, दरम्यान माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मूल उपजिल्हा रूग्णालयाला भेट देवुन डॉक्टरांच्या रिक्त पदाबाबत माहिती घेतली, यावेळी स्त्रिरोग तज्ञांची प्रतिनियुक्ती मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आलेली आहे मात्र त्या गेल्या दिड वर्षात एकही सिजर शस्त्रक्रिया केलेल्या नाही, यामुळे सिजर शस्त्रक्रियेसाठी स्त्रिरोग तज्ञ डॉ. मनिषा शेंडे यांना बोलावुन शस्त्रक्रिया करावी लागत आहे, यामुळे नियुक्त केलेल्या स्त्रिरोग तज्ञांचा फायदा काय? असा सवाल श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. महादेव चिंचोळे यांना केल्या, दरम्यान त्यांच्याठिकाणी इतर स्त्रिरोग तज्ञांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यासोबतच सर्जन, भुलतज्ञ, फिजीशियन आणि दंत शल्य चिकीत्सक यातज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याबाबत त्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांशी चर्चा केले. यावेळी श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी मूल उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त तज्ञ डॉक्टर आणि कर्मचाÚयांच्या समस्या सोडविण्याबाबत आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष अनिल संतोषवार, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, माजी सभापती महेंद्र करकाडे, बाबा अझिम, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक विवेक मुत्यलवार, सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ नर्मलवार, विपीन भालेराव, संतोष ठाकुरवार, निहाल गेडाम उपस्थित होते.