भाजपाच्या विकास कार्यावर हाच जनतेच्या विश्र्वास:-

भाजपाच्या विकास कार्यावर हाच जनतेच्या विश्र्वास:- महसूल मंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुल – प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री रोहीत भाऊ बोम्मावार यांचा सोबत अनेक कार्यकर्त्यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश

सावली येथील पंचायत समिती जवळ आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यास जनतेचा, कार्यकर्त्यांचा आणि नव्याने पक्षात दाखल झालेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,
यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि साथ फाऊंडेशन सावली चे अध्यक्ष मा. रोहित भाऊ बोम्मावार, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरदिप कोनपत्तीवार, नगरपंचायत सावली चे माजी उपाध्यक्ष भोगेश्र्वर मोहूर्ले, ग्रामपंचायत चारगाव येथील माजी सरपंच आकाश बुरीवार आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

या कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री मान. चंद्रशेखरजी बावनकुळे, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते आणि चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांची विशेष उपस्थिती होती

राज्याचे महसूल मंत्री मान. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले — “या परिसरात जनतेचा विश्वास भारतीय जनता पक्षावर दृढ आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विकासकामामुळे आणि जनतेच्या हितासाठी चाललेल्या कार्यपद्धतीमुळे आज अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे.”

पुढे बोलताना मान. बावनकुळे म्हणाले —“माजी खासदार डॉ. अशोकजी नेते हे नेहमी जनतेच्या संपर्कात राहून जनतेच्या अडी अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करत असतात,काँग्रेसवाल्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ बंद करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र ही योजना सुरू राहीलच, असा माझा विश्वास आहे. तसेच संविधान बदलवण्याचे खोटे आरोप काँग्रेस करत असली, तरी भाजप सत्तेत असूनही संविधान अबाधित आहे आणि राहील.”

या कार्यक्रमात भाजपात प्रवेश करणाऱ्या नागरिकांचे दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले.

*_“विजयाचा संकल्प करूया” — माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे आवाहन_*
या प्रसंगी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी बोलताना म्हणाले “आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजयाचा संकल्प करून कामाला लागा. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोदिया हा धान्य उत्पादक पट्टा असून या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे धान्य नष्ट झाले आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे.”

ते पुढे म्हणाले — “महसूल विभागाने पट्ट्यांच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने पाहावे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.”

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात भाजपा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ (किर्तीकुमार) भांगडिया,गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे,माजी आमदार तथा पदवीधर मतदारसंघाचे प्रमुख सुधाकरजी कोहळे,गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,ओबीसी समाजाचे नेते डॉ. अशोकजी जिवतोडे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूरचे अध्यक्ष रवीजी शिंदे,भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिलजी धानोरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष कृष्णा भाऊ सहारे, या कार्यक्रमाचे आयोजक व स्वतः भाजपात प्रवेश करून अनेकांना पक्षात आणणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहितभाऊ बोम्मावार,राज्य परिषद सदस्य राजूभाऊ देवतळे,
लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,जि.प. माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपलीवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल,भाजपा तालुकाध्यक्ष किशोरभाऊ वाकुडकर,महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा वंदना शेंडे,जिल्हा महामंत्री गीता हिंगे, संजय गजपुरे, गणेश तर्वेकर तसेच आवेश पठाण, देवराव सा‌ मुदमवार, अर्जुन भाऊ भोयर, देविदास बानबले, नीलम सुरमवार, छाया चकबंडलवार, सतिश बोम्मावार, सचिन तंगडपलीवार, नितिन कारडे, आशिष कार्लेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशासाठी कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा

या भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्याच्या यशासाठी
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्वाने अपार परिश्रम घेतले. संपूर्ण सावली परिसरात भाजपाचा झेंडा फडकत, घोषणांनी दुमदुमला,
आणि जनतेच्या उत्साहाने या कार्यक्रमाला यशस्वीतेचा नवा उत्साह संचारला.