प्रभाग क्रमांक ५ मधून दावेदारी उमेदवार – कुमुदिनी भोयर

प्रभाग क्रमांक ५ मधून दावेदारी उमेदवार – कुमुदिनी भोयर

मुल – प्रतिनिधी

मुल शहरात तालुक्यात कार्यरत असलेली कुमुदिनी भोयर हे समाजसेवेची आदर्श प्रेरणा आहे. उच्चशिक्षीत, उच्चविभुषीत आणी कर्तृत्ववान अशा या तरुणीने समाजातील पत्रकारितेच्या आणी महिला सक्षमकिरणाच्या क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे .
कुमुदिनी भोयर या प्रेसक्लब मुलच्या सचिव या पदावर कार्यरत आहेत .तसेच स्त्री शक्ती ग्रृप मुलच्या अध्यक्षा आहेत त्या अनेक सामाजीक उपक्रम राबवित असून महिलांच्या स्वावलंबनासाठी
शिक्षणासाठी आणी आरोग्य जागृतीसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत .
पत्रकारीतेच्या क्षेत्रात कुमुदिनी भोयर या मुल तालुक्यातील पहील्या महीला पत्रकार म्हणून ओळखल्या जातात .
सामाजीक स्थानीक समस्यावर आवाज उठविणाऱ्या आणी सत्याला वाचा फोडणार्या पत्रकार म्हणून त्यांची एक ओळख आहे.
कुमुदिनी कोरोना काळात कोरोना सेंटर येथे कोरोना रुग्नांची सेवा करणे , वाढदिवसानिमीत्य रुग्नांना फळ वाटप करणे तसेच वार्डातील म्हाताऱ्या लोकांना स्वतः दवाखान्यात नेउन उपचार करणे हे त्यांच्यातले गुण प्रेरणादी आहे .
कोरोना काळात कुमुदिनी स्वःत कोरोनाबाधीत असुनही कोवीड सेंटर मध्ये रुग्नांची सेवा केली . स्वताःचा जिव धोक्यात घालून त्यांनी अनेक रुग्नांना औषधे, अन्न आणी फळवाटप केले या त्यांच्या सेवाभावी कार्यामूळे त्या नागरीकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे .
वार्डातील नागरिकांसाठी त्या सेवा देण्यात तत्पर असतात . गरजू लोकांना दवाखाण्यात नेऊन व्रद्ध लोकांना शासकीय योजनांची माहिती देणे त्या जिद्द, चिकाटी, सयम हे त्यांचे गुण आहेत तसेच आरोग्य सेवांचा लाभ मिळवून देणे हे त्यांचे कार्य
त्यामुळेच ते मुल शहरात व तालुक्यात परिचीत आहेत.
सेवाभाव शिक्षण आणी समाज कार्याचा सुंदर संगम म्हणजेच कुमुदिनी भोयर .