मुल नप निवडणूक भाजपकडून प्रा किरण कापगते-बोरकर यांची उमेदवारी जाहीर –

मुल नप निवडणूक भाजपकडून प्रा किरण कापगते-बोरकर यांची उमेदवारी जाहीर

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन दाखल

मुल नगर परिषद निवडणुकीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर झाले असून नगराध्यक्ष उमेदवार म्हणून प्रा डॉ सौ किरण कापगते- बोरकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, आज आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत त्यांनी नामनिर्देशन दाखल केले, महिला जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, माजी नगराध्यक्ष सौ रत्नमाला भोयर, सौ उषाताई शेंडे, प्रभाकर भोयर, अजय गोगुलवार, नंदकिशोर रणदिवे, मोतीलाल टहलीयानी, अविनाश जगताप, तालुकाध्यक्ष चंदू मारगोनवार,शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, वंदना आगरकाटे,महिला शहराध्यक्ष मनीषा गाडलेवार, चंद्रकांत आष्टनकर,युवा अध्यक्ष सोनू लाडवे सर्व नगरसेवक, उमेदवार यांची उपस्थिती होती