कु.श्रीजा सुचित(बबलू) सहारे हिची
सुवर्णपदकासह अभूतपूर्व यश आणि नॅशनल चॅम्पियनशिप साठी निवड!!!
`मूल प्रतिनिधी:`
मूल तालुक्यातील शिरपेचात अभिमानाचा तूरा रोवणारी
कु.श्रीजा सुचित सहारे हिने बारामती जिल्हा पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविला आणि राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत दमदार शिक्कामोर्तब केला आहे.
`श्रीजा` हि मूल स्थित `सेंट अँन्स हायस्कूल` ची वर्ग ७ वी ची विद्यार्थिनी आहे.परिश्रमाची फलश्रुती, निश्चित ध्येय व निष्ठा उराशी बाळगून अपयशाने खचून न जाता सरावातील सातत्य व प्रशिक्षक इम्रान खान ह्यांचे मार्गदर्शन तथा आई वडील श्री.सुचित(बबलू) सहारे व सौ.सपना सुचित सहारे* ह्यांच्या प्रोत्साहना मुळे तिने ही उत्तुंग भरारी घेतली आहे.
श्रीजा चे यशाचा सार्थ अभिमान आहे.तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असुन
मनस्वी अभिनंदन करीत पुढील महिन्यात होत असलेल्या
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी आणि पुढील वाटचालीस शुभदायी शुभेच्छा सर्वांनी देऊन कु. श्रीजा हिची ऊर्जा व उत्साह नी राष्ट्रीय स्पर्धेत आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरेल ही सदिच्छा व विश्वास व्यक्त केला. पुढील कामगिरी साठी शुभकामना व्यक्त केली आहे.




