बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे 77 वा गणतंत्र दिन साजरा –
मुल- प्रतिनिधी
मुल येथील बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे 26 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात 77 वा गणतंत्र दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. अनिल वैरागडे, अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, मूल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच उदघाटक म्हणून सौं. एकताताई समर्थ नगराध्यक्ष नगर परिषद मूल आणि विशेष अतिथी म्हणून श्री. प्रशांत समर्थ बांधकाम सभापती नगर परिषद मूल प्रमुख पाहुणे म्हणून वैभव खांडरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सावली आणि सौ. जयश्री गुज्जनवार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुल व सौं. प्राची अक्केवार नगरसेविका नगर परिषद मुल श्री शशिकांत धर्माधिकारी सर सचिव शिक्षण प्रसारक मंडळ, मूल श्री प्रणव वैरागडे उपाध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मूल, श्री अविनाश गरपल्लीवार प्राचार्य पंचायत राज मूल श्री बावणे सर विस्तार अधिकारी पंचायत समिती मूल सौं सुरभी वैरागडे आणि शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या फोटोला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. शाळेचे प्राचार्य बोलीवार सर यांनी प्रस्ताविक मनोगत केले, तर ऍड. अनिल वैरागडे सरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व विविध,उदाहरणे, दाखले देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून देशभक्तीचा संदेश दिला. विद्यार्थांनी देशभक्तीपर भाषणे दिली, तसेच देशभक्ती नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कराटेच्या सादरीकरणांनी पालकांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पारितोषिके व प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले
. तसेच पालकांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्राविण्य प्राप्त केले त्यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रभारी सौ. तोषी जयस्वाल,सौं. दर्शना शैलेकर, प्रणाली कुंभरे, आणि कुमारी प्रज्ञा रामटेके (इ. ९ वी) व कुमारी नव्या पेंदोर (इ. ९ वी) यांनी केले, तर आभार प्रदर्शन शैक्षणिक प्रभारी सौं. दुर्गा कोटगले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना अथक परिश्रम घेतल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या राष्ट्रगानाने करण्यात आली.




