नगर परिषद मुल येथे शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न –

मुल – प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांनी द्विप प्रज्वलन करून शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केले . उपस्थित सर्व नगर सेवक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहुन नमन केले .
नगराध्यक्ष यांनी शिवाजी महाराज यांच्या जिवनावर प्रकाश टाकला .
यावेळी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ , सभापती लिना फुलझेले , उपसभापती
समिक्षा कडस्कर
नगर सेवक विवेक मुत्यालवार , अतुल गोवर्धन
विलास कागदेलवार , रितीक गोयल आणी नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते .