जे. सी.आय. मूल चे पदग्रहण समारंभ थाटात संपन्न.
मूल:— जेसीआय मूल चा पदग्रहण 2026 समारंभ नुकताच हाॅटेल रानसंपन्न येथे थाटात संपन्न झाला. यावेळी उदघाटक म्हणून नगराध्यक्षा
ऐकता समर्थ उपस्थित होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून दोन 3 चे झोन
प्रेसिडेंट जेएफडी सौरव गटाणी व जेएफडी ज्ञानेश कचलाॅवार हे होते.
नगराध्यक्षा ऐकता समर्थ यांनी
पदग्रहण सोहळ्याचे उदघाटन
केल्यानंतर मावळते अध्यक्ष जेसी
आशिष उधवानी यांना 2025 मध्ये
केलेल्या कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गत
वषींच्या कार्यचा लेखाजोखा मावळते अध्यक्ष जेसी आशिष उधवानी यांनी सादर केल्यानंतर
नवनियुक्त अध्यक्ष जेसी जय संजय
येरोजवार यांना शपथ देऊन पदग्रहण सोहळ्याची सुरवात केली.
नवनियुक्त अध्यक्ष जेसी जय संजय येरोजवार यांनी नवनियुक्त सचिव जेसी अनिकेत बिरेवार व
2026 चे कार्यकारी मंडळास शपथ
दिली.
शपथविधी सोहळ्याच्या उदघाटीका नगराध्यक्षा ऐकता समर्थ
यांनी जेसी च्या कार्याचे कौतुक केले व
पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या.
या उदघाटन सोहळ्याचे यशस्वीते करीता फाऊंडर अध्यक्ष जेसी आशिष गोयल, पुर्व अध्यक्ष जेसी प्रणव
वैरागडे,जेसी किशोर गोगुलवार यांनी
परिश्रम घेतले.
या पदग्रहण सोहळ्यात जेएसी संजय येरोजवार, विभागीय अध्यक्ष
जेएसी निलेश राॅय, जेएसी अविनाश गरपल्लीवार, जेसी. मधुकर शेंडे, जेसी. अनिल बिरेवार यांचेसह पत्रकार बांधव व शुभेच्छुक मोठया
संख्येने उपस्थित होते.
पदग्रहण सोहळ्याचे संचालन जेसी
निलय गावतुरे यांनी केले. व आभार जेसी. प्रज्वल
हांडेकर यांनी मानले.




