चामोर्शी तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर
चामोर्शी,दि. २१/१२/२०२२
एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय चामोर्शी, राष्ट्रीय असर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय चामोर्शी तसेच नगर पंचायत चामोर्शी च्या वतीने नगरपंचायत चामोर्शी येथे आज दि . २१ डिसेंबर रोजी नगर पंचायत सभागृहात ४५ स्वच्छता कर्मचारी यांची आरोग्य तपासनी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष जयश्री वायलालवार , उपाध्यक्ष लोमेश बुरांडे , ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. आशितोष जावडेकर , समुपदेशक पुरुषोत्तम घ्यार ,आय. सी. टी.सी.नागेश मादेशी ,प्राजक्ता पापनवाडे , राजेंद्र अल्लीवार , स्वच्छता निरीक्षक अलकेश बन्सोड , रूषी गोरडवार , कर्मचारी उपस्थित होते .
एकूण ४५ बीपी शुगर, ४२ एच. आय. व्ही आणि ४५ दंत तपासणी करण्यात आले. स्वच्छता मंजुर , न . प . कर्मचारी , अधिकारी यांची आरोग्य तपासनी करण्यात आली.



