गिरगांव ग्रा.प मध्ये वंचितच्या प्रियंका खोब्रागडे यांची उपसरपंच पदी निवड

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

नवरगाव,दि.११/०१/२०२३ 

गिरगाव ग्रामपंचायत निवडनुकी मध्ये वार्ड नं ३ मधिल वंचित चे अनु:जाती राखिव मधुन इंजी विकास गोंडांने आणि सर्वसाधारण स्त्री राखिव मधुन उम्मेदवार सौ प्रियंका खोब्रागडे बिनविरोध निवडुन आले होते . यावेळी समाजाने एकसंघ होत पहील्यांदा बिन विरोध निवडुन आणण्याचे कार्य समाजबाधवांनी केले.गिरगांव येथिल ग्रा.प निवडणुक नेहमीच चर्चेचा विषय राहली आहे, यावेळी ग्रा प . सरपंच पदाकरीता सर्वसाधारण स्त्री राखिव होती त्यानंतर निवडनुकीचा निकाल हाती आला असता काँग्रेस चे 7 तर भाजप चे 4 आणि वंचित बहुजन आघाडी चे प्रियंका खोब्रागडे व विकास गोंडाने अनपोझ सदस्य निवडुन आले असल्याने उपसरपंच पदी चुरस निर्मान झाली होती आणि वंचित बहुजन आघाडी चे उम्मेदवार प्रियंकाताई गौतम खोब्रागडे यांची उपसरपंच पदी निवड झाली असुन वंचित बहुजन आघाडी चे विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर, अश्विन मेश्राम , स्नेहदिप खोब्रागडे यांनी त्यांचे स्वागत केले आहे