जनवार्ता ‘ न्युज पोर्टल चे शुभारंभ. *मान्यवरांनी दिल्यात मनस्वी शुभेच्छा

मूल:—महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी तथा पत्रकार धर्मेंद्रसुत्रपवार यांनी सुरू केलेल्या न्युज पोर्टल चे शुभारंभ जेष्ठ पत्रकार तथा राज्य पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांचे हस्ते करण्यात आले.

पत्रकारीतेतील अनुभव व जिल्ह्यातील विविध बातम्या वाचकांपर्यंत पोहचविण्याची बांधिलकी जोपासून ‘ जनवार्ता’ न्युज पोर्टल चे माध्यमातून कायॅ करण्याचा
मानस यावेळी संपादक धर्मेंद्र सुत्रपवार यांनी व्यक्त केला.
‘ जनवार्ता ‘ न्युज पोर्टल शुभारंभ छोटेखानी कार्यक्रमात वरिष्ठ
पत्रकार तथा संपादक प्रेस क्लब चे अध्यक्ष विजय सिद्धांवार, राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सतिश राजूरवार,
सचिव राजेंद्र वाढई, प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार अमित
राऊत, पत्रकार दत्तू वाराणशीवार, राजेंद्र सुत्र पवार आदी उपस्थित होते.

परिसरातील अनेक मान्यवरांनी ‘ जनवार्ता ‘ न्युज पोर्टल
शुभारंभानिमीत्याने धर्मेंद्र सुत्रपवार यांना शुभेच्छा दिल्यात.