ग्रामजयंती महोत्सव संपन्न
वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामजयंती पर्वात भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळ तालुका शाखा मुल आणि श्री गुरुदेव बचत गट मुल च्या संयुक्त विद्यमाने रामलीला भवन मुल येथे श्री गुरुदेव कार्यकर्ता व सेवकांचे प्रबोधन संमेलन आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर तर उद्घाटक म्हणून आदर्श गाव राजगडचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य आणि ग्रामगीतेचे गाढे अभ्यासक आदर्श व्यक्तीमत्व चंदु पाटील मारकवार तर प्रमुख मार्गदर्शक ग्रामगीताचार्य शंकरजी गुरनुले , माजी नगराध्यक्षा रत्नाताई भोयर, प्रमुख अतिथी प्रा.नामदेव मोरे , विजय चिताडे, अविनाश जगताप,संदिप कटकुरवार, विलासराव चौधरी , प्रभाकर भोयर, यांची उपस्थिती होती.
ग्रामजयंती महोत्सवाची सुरुवात प्रातःकाळी सामुदायिक ध्यानपाठाने झाली यावेळी संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य अशोकराव कोसरे यांनी चिंतन प्रस्तुत केले.भजन संमेलनात मुल तालुक्यातील शाखा श्री गुरुदेव सेवा मंडळ मारोडा, श्री गुरुदेव सेवा मंडळ उश्राळा चक, श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ मुल, श्री गुरुदेव सेवा मंडळ येरगाव, श्री संताजी महिला भजन मंडळ मुल, श्री गुरुदेव सेवा मंडळ सिंतळा, श्री गुरुदेव सेवा मंडळ पिपरी दिक्षित यांनी भजन सेवा दिली.मान्यवरांच्या हस्ते अधिष्ठान पुजन, भगवान महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण आणि “गुरूदेव हमारा प्यारा” या संकल्प गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.मुकेश गेडाम, रविंद्र चलाख यांनी अनुभव कथन केले आणि मान्यवरांच्या मार्गदर्शना नतंर ग्रामगीताचार्य शरदभाऊ सहारे यांचे ग्रामजयंतीविशेष प्रबोधनात्मक किर्तन झाले.
याप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळातील जेष्ठ मार्गदर्शक, सेवाकर्ते उमाजी मंडलवार चिखली, नामदेवराव गावतुरे मुल, गजानन कोलप्याकवार मारोडा,आशन्नाजी चौधरी टेकाडी,शामरावजी कन्नाके उश्राळा चक, गिरमाजी भोयर मुल,डॉ.राम दांडेकर,खुशाल मसराम डोंगरगाव, आनंदाबाई हळदीकर, प्रदिप नागापुरे येरगाव, सुधाकर टेकाम पिपरी दिक्षित, यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच भजन संमेलनात सहभागी श्री गुरुदेव भजन मंडळाना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिमा व प्रार्थना पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव पिजदुरकर, सुत्रसंचालन उमेश उरकुडे , आभारप्रदर्शन गणेश मांडवकर तर अहवाल वाचन आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. वसंतराव ताजने यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुखदेव चौथाले,विजय लाडेकर,सितकुराजी देशमुख, चंद्रशेखर पिदुरकर, गुरूदेव बोदलकर,निलेश माथनकर, किसनराव वासाडे, माणिक पाटेवार, रमेश तांगडे, गजेंद्र वरगंटीवार, धनंजय गोहणे,नंदु बतकमवार, भगवान मंडलवार, अंबादास राजनकर,साईनाथ भुप्रतवार, संतोष चलाख, धनराज उईके,सुमनताई गोविंदवार,अल्का कामडी,प्रभा चौथाले, शशिकला मांडवकर, मंगला ताजने, सविता पिजदुरकर, सरीता झाडे, दिपाली मांडवकर, उषाताई वासाडे, कल्पना पिदुरकर, सुनंदा लाडेकर ,सुलोचना तांगडे, उर्मिला गोहणे, वैशाली सहारे,जयश्री माथनकर,प्रितीशा पाटेवार ,माधुरी बोदलकर आदींनी सहकार्य केले.




