मुल पोलीसांची कोंबडा बाजार जुगारावर धाड .

मुल पोलीसांची कोंबडा बाजार जुगारावर धाड .

तिन आरोपी सह मुद्देमाल जप्त .
मुल तालुका प्रतिनिधी
दि ८/६/२०२५ रोजी दुपारी मिळालेल्या गोपनिय माहिती वरून पो.स्टे. मुल कार्यक्षेत्रा अंतर्गत असलेले स्मशानभूमी जवळ मौजा चेक फुटाणा ता. पोंभूर्णा . जिल्हा चंद्रपूर सार्वजनिक ठिकाणी पोलीस स्टॉप सह धाड टाकली असता काही इसम कोंबड्याच्या पायांना काती बांधून त्यांची झुंड लावून त्यावर पैशांची बाजी लावून कोंबड्यांचा व पैशांचा हारजित जुगार खेळत असतांना दिसून आले ते आम्हास पाहुन पळत सुटले असता त्यांचा आम्ही पाठलाग करून कोंबडा बाजार जुगार खेळणारे तीन इसमांना पकडण्यात यश आले उर्वरीत १० जुगारी इसम हे त्यांचे वाहन मोक्यावर सोडून पळून गेले घटनास्थळी पळून गेलेल्या इसमांचे मोटार सायकल व काळीपिवळी वाहने तसेच मिळून आलेले ५ कोंबडे व
२० धारधार कात्या व पकडण्यात आलेले जुगारी इसम यांचे अंगझडती मध्ये
असे ७,२४,७०० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आले व आरोपींना पकडण्यात आले गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे . १) संजय रामदास सोनटक्के रा चेक फुटाणा, प्रविण चरणदा सोनटक्के देवाडा खुर्द , भिमाशंकर पेंदोर रा कवळजई मुल पोलीस स्टेशन येथे एकुन १३ आरोपीवर अपराध क्र.२१५,
२२५, कलम १२ ( अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . यात मुल उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव (अतिरिक्त कार्यभार उपविभागीय मुल)व मुल पोलिस प्रभारी ठाणेदार सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणारे अमलदार अमित कुमार आत्राम , जमीर खान पठान
सुनिल कुळमेथे , वेदनाथ करंबे, गणेश मेश्राम , भोजराज मुंडरे, प्रशांत गायकवाड, नरेश कोडापे,
पंकज बगडे, शिवशंकर डुकरे .व मुल पोलिस स्टेशन अंतर्गत ही ह्या वर्षीची मोठी कारवाई व, कोंबड्या बाजाराला चाप बसली हि विशेष