पिक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना आव्हान.

पिक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना आव्हान.

 

सावली :- तालुक्यात मोठया प्रमाणात शेती केल्या जात असून या व्येवसायात अनेक जोखीम आहेत यात निसर्गाचे लहरीपणामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, वातावरणीय बदलाचे परिणाम व कीड – रोगांचा प्रादुर्भाव अश्या नानाविध संकटान्ना शेतकऱ्यांना तोंड देत शेती करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांची जोखीम कमी करून हमखास उत्पनाची हमी मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधान मंत्री पिक विमा योजना लागू केली आहे. मागील काळात 1 रुपयात पिक विमा काढण्याची योजना महाराष्ट्र शासनाने लागू केली होती त्यात शासन विमा हप्त्याची रक्कम शासनकडून भरू पिकांचा विमा उतरवीला जात होता. मात्र सन 2025-26 खरीप हंगामा पासून सादर 1 रुपयात पिक विमा योजना बंद करून परत पूर्वीप्रमाणेच विमा हप्त्याचे 2 टक्के रक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार असून उर्वरित 2 टक्के रक्कम शासन भरणार आहे. सदर योजनेत पिक कापणी प्रयोगावर आधारित विमा नुकसान दिल्या जाणार असून एकंदर महसूल मंडळाचे उंबरठा उत्पन्नाचे आधारे नुकसान परिगणना करून विमा मदत मिळणार आहे.
सदर योजनेचा प्रचार प्रसार कारणे करीता कृषि विभाग प्रयत्नतर असून नुकतेचे सावली तहसील कार्यालयाचे प्रांगानातून तहसीलदार श्रीमती प्रांजली चिराडे यांचे प्रमुख उपस्थितीत प्रचार कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. प्रसंगी तहसीलदार व तालुका कृषि अधिकारी श्री ललित राऊत तांनी पिक विमा योजणेबाबत माहीती देऊन यजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले तसेच योजनेचे प्रचार प्रसार गावोगावी करणेबाबत उपस्थित कृषि कर्मचारी यांना निर्देश दिले.
योजनेत सहभागी होने करीता शेतकऱ्यांनी फार्मर आय.डी. काढणे अनिवार्य असून पिक विमा काढणे करीता 7/12, बँक पासबुक, आधार कार्ड व पिक पेरा प्रमाणपत्र घेऊन नजीकचे शेतू केंद्रात विमा हप्त्याची 2 टक्के रक्कम भरून पिक विमा काढणे बाबत माहीती देण्यात आली. सदर प्रसंगी मंडळ कृषि अधिकार श्री दिनेश पानसे, कृषि अधिकारी श्रीमती आशा शिंदे, उप कृषि अधिकारी श्री सचिन जाधव, सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, पिक विमा प्रतिनिधी श्री सुशांत निकोडे यांची उपस्थिती होती.