सावली तालुक्यात कृषि केंद्र तपासणी जोमात सुरु. दोषी आढळल्यास कृषि केंद्र संचालक यांचेवर होणार कार्यवाही.
सावली – शेतकऱ्यांना शेतीसाठी अत्यावशक निविष्ठा बियाने, खते तर प्रासंगिक निविष्ठा कीटकनाशके, तन नाशके इत्यादी मिळन्याचे स्थानिक विश्वासार्ह स्रोत हे परिसरातील कृषिकेंद्र असतात. मात्र शेतकऱ्यांचे अज्ञानाचा फायदा घेत निविष्ठा गुणवंत्ता, निविष्ठा किंमती, साठेबाजी व लिंकिंग बाबत काही ठिकानात शेतकऱ्यांची निविष्ठा पुरवठा धारकांकडून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाबी टाळण्याचे अनुषंगाने व शेतकऱ्यास दर्जेदार निविष्ठा योग्य वेळी योग्य त्या दारात मिळावे यासाठी कृषि विभागाने कृषि केंद्र तपासण्या अभियान स्वरूपात सुरु केल्या असून दोषी आढळल्यास कृषि केंद्र संचालकांवर कार्यवाही करण्यात येत आहे.
सावली तालुक्यात 70 नोंदणीकृत कृषि केंद्र असून आजतागत 25 कृषि केंद्राची झाडाझडती घेण्यात आली त्यापैकी 9 कृषि केंद्रान्ना सुधारणा करणे करीता नोटीस देण्यात आले असून एका कृषि केंद्रावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली असल्याची व अशी कार्यवाही यापुढे निरंतर सुरु राहणार असल्याची माहीती तालुका कृषि निविष्ठा निरीक्षक दिनेश पानसे यांनी दिली आहे. केंद्र संचालक यांनी नोंदणी प्रमाणपत्राचे अटी व शर्ती तथा कायदेशीर नियमाचे पालन करून शेतकऱ्यांना निविष्ठा पुरवठा करावे, तसेच खते व कृषि निविष्ठा बाबत प्राप्त साठा व त्याची खरेदी देयके, गोदाम व कालबाह्या निविष्ठा साठा, साठा रजिस्टर, ई पॉस मशीन वरील साठा इत्यादी अद्ययावत ठेऊन आवश्यक ते फलक व नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात प्रदर्शित कारणे अत्यावशक असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शेतकऱ्यांना निविष्ठा मिळणेस काही अडचण व तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तालुका किंवा जिल्हा तक्रार निवारन समिती कडे तक्रार करावी किंवा कृषि आयुक्तालयाचे वॉट्सअँप गृप वर रीतसर तक्रार करावी अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालस संपर्क करावा असे आव्हान केले आहे.




