देवनिल विद्यालय टेकाडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

देवनिल विद्यालय टेकाडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

मुल – प्रतिनिधी

विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित देवनिल विद्यालय टेकाडी येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थाध्यक्ष देवरावजी भांडेकर माजी आमदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक राजेश सावरकर, प्रमोद पाटील बोमनवार, अनिलजी बोमनवार, ईश्वर जराते, विनोद गोहणे,शरद गणवीर, प्रविण गोहणे, विलास जक्कुलवार, संतोष मस्कावार,ओमदेव मोहूर्ले आदींसह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयातील स्काऊट गाईड आणि हरीत सेना पथकाने मानवंदना दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त टेकाडी येथील मुख्य मार्गाने तिरंगा प्रभात फेरी नंतर विद्यार्थ्यांनी संगीत कवायत, देशभक्तीपर गीत गायन, नृत्य सादरीकरणासह ,भाषण स्पर्धेतही उत्स्फूर्त सहभाग घेतला. संचालन डिंपल कोटरंगे, समृद्धी नागोसे यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली भांडेकर यांनी केले.राष्ट्रवंदना गायनाने कार्यक्रम संपन्न झाला.