गॅस चोरीवर आळा घालण्यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन-

गॅस चोरीवर आळा घालण्यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन .

मूल – प्रतिनिधी

शहरातील एमआयडीसी परिसरातील गॅस सिलेंडर च्या गोदामात मंगळवारी झालेल्या स्फोटात ६ जण जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेत मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु,भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या मूल शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी तहसीलदार मृदुला मोरे यांना घटनेची चौकशी करण्यासाठी निवेदन सादर केले.
सिलेंडर मधून गॅस चोरी करून ग्राहकांना लुटण्याची प्रक्रिया बऱ्याच काळापासून सुरू होती, यावर आळा बसावा,अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या गोदामात ज्वलनशील पदार्थ असूनही, कंपनीकडून कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही, ज्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. शिवाय, मागणीनुसार, ग्राहकांना गॅस सिलेंडर देताना कंपनीने त्याचे मानकानुसार वजन करावे, असे सांगण्यात आले आहे. या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तहसीलदारांना तात्काळ कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.
निवेदन देतांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल शाखा चे अध्यक्ष राकेश ठाकरे, सचिव मेहुल मनियार, संघटक बंडू गुरुनूले, सह संघटक विवेक मांदाडे, कोषाध्यक्ष महेश गाजुलवार, प्रसिद्धि प्रमुख प्रशांत बोबाटे, संतोष गाजुलवार, युवराज चावरे, सुनील कुकडकर आदी उपस्थित होते.