मुल येथील शालेय क्रीडा वेटलिफ्टिंगचे पाच चँपियन  राज्यस्तरावर –

 

मुल- धर्मेंद्र सुत्रपवार

क्रीडा व युवक सेवा
संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत चंद्रपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेतील तालुका क्रीडा संकुल मुल येथील विजयी खेळाडूंनी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या विद्यमानाने वर्धा येथे आयोजित नागपूर विभागीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. वर्धा येथे झालेल्या नागपूर विभागीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत एकूण सहा खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी पाच खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विजयी खेळाडू तालुका क्रीडा संकुल मूल येथील प्रशिक्षण करण सुरेश कोसरे यांच्याकडे निशुल्क प्रशिक्षण घेत आहेत या खेळाडूंनी सर्वप्रथम जिल्हास्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून विभागीय स्तरावर भरारी झेप घेत मोठे यश मिळविलेला आहे ते खालील प्रमाणे 17 वर्षे खालील मुला-मुलींमध्ये 48 किलो वजन गटात श्रावणी आंबुलकर, 53 किलो वजन गटात तेजस्वी चौखूंडे, 69 किलो वजन गटात साची लाकडे आणि 98 किलो वजन गटाआतील मुलांमध्ये श्रुंखल आंबटकर तर 19 वर्षाखालील मुलींमध्ये श्रुती चंद्रकांत लोणबले असे एकूण पाच प्रथम तर स्वरा गांगरेडिवार द्वितीय असा मोठा यश संपादन केला आहे प्रथम क्रमांकाचे विजयी खेळाडू नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरी शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत नागपुर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत क्रीडा संकुल मुल येथील वेटलिफ्टिंग मार्गदर्शक करण सुरेश कोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुल तालुक्यातील विविध खेळाडू गेल्या काही वर्षापासून क्रीडा संकुल मुल येथे प्रशिक्षण घेत आहेत मुल शहरात विविध भागातून वेटलिफ्टिंग खेळाडू घडत आहेत क्रीडा संकुल मधील खेळाडू दरवर्षी राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर अशा मोठ्या पातळीवर प्रतिनिधित्व करीत आपल्या मूल शहराचे वर्चस्व सिद्ध केलेले आढळून येत आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात मूल शहरात वेटलिफ्टिंगच्या प्रशिक्षक आणि खेळाडूंनी भरीव कार्य केल्याचे आढळून येत आहे.
मुल तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठीकरे सर, क्रीडा संयोजक नामदेव पिजूरकर सर, क्रीडा शिक्षक दिनेश जिद्दीवार सर, गुरूदास चौधरी सर, अमोल रामटेके सर, आकाश चौधरी सर, स्वप्निल नवघडे सर, रूपचंद उराडे सर यांनी विजयी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.