सकल ओबीसी मोर्चाला विदर्भ तेली समाज महासंघाचा पाठिंबा जाहीर
१० ऑक्टोबर २०२५ ला तेली समाजाने मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन
मुल – प्रतिनिधी
…………………………..
येत्या दिनांक १० ऑक्टोबर २०२५ ला नागपूर येथे आयोजित सकल ओबीसी मोर्चाला विदर्भ तेली समाज महासंघाचा जाहीर पाठिंबा असून या मोर्चामध्ये विदर्भ तेली समाज महासंघ सामिल होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरवण्यात आले.त्याचप्रमाणे तेली समाजाचे संवैधानिक अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी तेली समाजातील विविध संघटनांनी तेली समाजाने सकल ओबीसी मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर सामिल होण्याचे आवाहन विदर्भ तेली समाज महासंघाने केले आहे.
विदर्भ तेली समाज महासंघ सातत्याने तेली समाजाच्या अस्मितेसाठी आणि हक्कासाठी प्रबोधन करीत आहे. तेली समाजाला ओबिसीचे लाभ मिळावे म्हणून मंडल आयोग लागू होण्यासाठी, तेली समाजातील पोट जातींची समस्या सोडविण्यासाठी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी, आणि शेती शेतमजूरी करणाऱ्या समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढत आहे. ओबीसी प्रवर्गात अठरापगड जाती येत असून तेली जातीचा ओबीसीत समावेश आहे. ओबीसींना जे संवैधानिक आरक्षण लागू करण्यात आले आहे त्याचा लाभ ओबीसीमधील विविध जातींसह तेली समाजाला मिळत आहे. तथापि ओबीसी समाज ५२℅ असूनदेखील केवळ २७℅ आरक्षण मिळतं महाराष्ट्रात तर ते १९℅ वर आणून ठेवले. आणि असे असताना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ केले तर ओबीसी आरक्षणाचा किती खेळखंडोबा होऊन जाईल, याची कल्पना करा. ओबीसींना आधीच अपुरे आरक्षण आणि त्यात वाटेकऱ्यांची वाढती संख्या यामुळे ओबीसी अंतर्गत स्पर्धा आणि भांडणं वाढण्यास पैस निर्माण केला आहे. त्यामुळे ओबीसी समाज पूर्णपणे प्रभावित होणार असून हे ओबीसीच्या संवैधानिक हक्कावर गंडांतर आहे. ओबीसी वर अन्यायकारक आहे. ओबीसी हक्कावर आलेले संकट परतवून लावण्यासाठी येत्या १० तारखेला तेली समाजासह कुणबी, माळी, लोहार, सोनार, सुतार इ. अठरापगड जाती समूहांनी सकल ओबीसी मोर्चा मध्ये बहुसंख्येने सामिल व्हावे. असे आवाहन विदर्भ तेली समाज महाघासंघाचे पदाअधिकार केंद्रीय अध्यक्ष रघुनाथ शेंडे, सरचिटणीस डॉ नामदेव हटवार, मार्गदर्शक विजय बाभूळकर, संजय शेंडे, संजय नरखेडकर, अनुज हुलके,आनंद कृपान, राजेश चांदेकर, नारायण बावनकर, राजू वंजारी ,सागर काटेखाये ,प्रकाश भुरे, रविंद्र मानापुरे, नितीन कारेमोरे ,डॉ संजय बेले, कैलास चलाख,डॉ नामदेव वरभे ,सुरेश भांडेकर, प्रा. देवानंद कामडी, सतीश ईखार, डॉ . प्रभुदास चिलबुले , गंगाधर कुनघाडकर , हरिहर पोहाणे , प्रा. पितांबर पिसे , सतीश बावणे , भूपेश लाखे , डॉ. माधवराव वरभे, प्रा. मधुकरराव रागीट , ईश्वर डुकरे, विनायक घुगुस्कर , विनायक चिलबुले, प्रा . अभय घटे, प्रदिप तळवेकर , हरिशचंद्र मेहेरे , प्रेमकुमार हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.




