मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न;

मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न;

रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप.

मुल – प्रतिनीधी

मारोडा: (ता. मुल, जि. चंद्रपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) मारोडा येथे नुकतेच रक्तदान आणि सर्वसमावेशक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात पी.एच.सी. मारोडा अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील गर्भवती महिला तसेच इतर रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरासाठी मुलचे गटविकास अधिकारी (BDO) साहेब, मारोडा पी.एच.सी.चे सर्व डॉक्टर आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोशल मीडिया तालुका प्रमुख श्री. शिवम राजू चल्लावार यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांना फळे आणि बिस्किटांचे वाटप केले. तसेच, त्यांनी उपस्थितांना आरोग्याविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

आरोग्य आणि रक्तदानाचे महत्त्व पटवून देणाऱ्या या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन लाभले. श्री. शिवम चल्लावार यांनी सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांना केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले जात आहेत.