श्री संत नगाजी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्सहात संपन्न-

श्री संत नगाजी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्सहात संपन्न-

मुल- प्रतिनीधी

नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज यांची पुण्यतिथी दि .८/१०/२०२५ रोज बुधवारला नाभिक समाज सभागृह इथे साजरी करण्यात आली .
सर्वप्रथम या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून लाभलेले नाभिक समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते अंबादासजी अमदुर्तीवार तसेच समाजाचे सक्रीय कार्यकर्ते अशोक एडनुत्तलवार या मान्यवरांच्या हस्ते श्री संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेला द्विप प्रज्वलन व मालार्पन करण्यात आले .
या कार्यक्रमाची सुरवात भजन व कीर्तनाने करण्यात आली . त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी श्री संत नगाजी महाराज यांच्या जिवन कार्यावर प्रकाश . टाकत समाज बांधवांना प्रेरणादायी मोलाचे मार्गदर्शन केले . कार्यक्रमानंतर लगेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले . मोठ्या उत्सहाने भक्तीभावाने समाज बांधव व भगनींनी उपस्थित राहून संताच्या स्मृतीस अभिवादन केले .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुकान असोशियन संघटनेचे अध्यक्ष सागर इनमवार उपाध्यक्ष किशोर आंबुलकर सचिव बंटी गालपेल्लीवार , किशोर सुत्रपवार, विठ्ठल नक्षिणे , सागर जांपलवार, राजेंन्द्र सुत्रपवार, सुनिल एडनुत्तलवार , प्रमोद एडनुत्तल वार , प्रशांत इनंमवार , धर्मेंद्र सुत्रपवार
सचिन जांपलवार , विनोद एनुत्तलवार , सोमेश्वर भेंडारे,
आकाश नक्षिणे, विकास इनंमवार मारोती जांपलवार
अनिल एडनुत्तलवार यांनी परिश्रम घेतले .
मोठ्या संख्येने नाभिक समाज बांधव भगिणी या कार्यक्रमाला उपस्थित होते .