गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग पॉवरलिफ्टिंग आणी बेस्टफीसीक्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन .
दिनांक 09 ऑक्टोबर, गुरुवार रोजी तालुका क्रीडा संकुल, मुल. येथील वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्रात गोंडवाना विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बेस्टफिझीक्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा तालुका क्रीडा संकुल चे प्रशिक्षक तसेच ग्रुप ऑफ फीट लिफ्टर चे संचालक एन.आय.एस. कोच करण सुरेश कोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हातील कर्मवीर महाविद्यालय मुल, डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम. डॉ. शांताराम पोटदुखे महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, चिंतामणी महाविद्यालय घुघूस, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा आशा विविध तीस ते चाळीस महाविद्यालयातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता.
सर्व प्रथम सर्व खेळाडूंची वजने घेण्यात आली.
त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठातील शारिरीक शिक्षण क्रीडा विभागाच्या संचालिका डॉ. अनिता लोखंडे मॅडम तर अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती मूल चे अध्यक्ष श्री. अखिल भाऊ गांगरेडिवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार
श्री धर्मेंद्र भाऊ सूत्रपवार, राकेश भाऊ सातपैसे, हे लाभले होते
उद्घाटना नंतर लगेच स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत विविध महाविद्यालयातील खेळाडूंनी आपापल्या वजनीगटांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला विजयी खेळाडूंना मेडल्स देऊ मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
विजयी खेळाडू मध्ये तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण घेत असलेली वेटलिफ्टिंग खेळाडू महिमा वाघ आणि आचल करंजेकर यांनी आपापल्या वजनी गटात प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक पटकाविला.
हे सर्व विजयी खेळाडू होणाऱ्या अखिल भारतीय आंतर-विद्यापिठ स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
ही स्पर्धा नियोजन पूर्वक आणि कोणत्या ही प्रकारच्या तांत्रिक अडचणी न येता शांततेने पार पडल्या याचे श्रेय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक करण कोसरे यांना जाते. यांना मदत करण्यास तांत्रिक अधिकारी म्हणून लाभलेले श्री. अमोल आवडे, आकाश चौधरी, पंकज बेले ,दीपक भांडारकर, विष्णूवर्धन येरमी भुषण देशमुख, शार्विल देआरकर आकाश भाऊ इ. स्पर्धांचे पंच म्हणून कार्यभार सांभाळले
वेटलिफ्टिंग प्रशिक्षक करण कोसरे यांनी स्पर्धेला नियोजनबद्ध पार पाडल्या बद्दल डॉ.अनिता लोखंडे मॅडम यांनी शब्दसमूहाने करण कोसरे यांचे आभार माणून त्याना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. अनिता लोखंडे मॅडम, तालुका क्रीडा अधिकारी श्री विनोद ठीकरे सर, तालुका क्रीडा संयोजक श्री नामदेवजी पिजुरकर सर, डॉ. आशिष चहारे सर, डॉ. विक्की पेटकर सर, या सर्व मान्यवरांनी सर्व खेळाडूंचे आभार माणून पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या. ….




