भेजगाव येथे 13 जानेवारीला मोतीबिंदू नेत्र – तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

भेजगाव येथे 13 जानेवारीला मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर-

सक्षम फाउंडेशनचा पुढाकार .

मूल – प्रतिनधी

मुल तालुक्यातील भेजगाव येथे राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत समता फाउंडेशन, मुंबई, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर व सक्षम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार, दिनांक 13 जानेवारी रोजी ग्रामपंचायत आवारात आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची सखोल नेत्र तपासणी करण्यात येणार असून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या रुग्णांवर नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रुग्णांची तपासणी, नागपूर येथे ने-आण, शस्त्रक्रिया तसेच राहण्याची संपूर्ण व्यवस्था पूर्णतः मोफत असणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सक्षम फाउंडेशनने या शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजिका विशाखा शशिकांत गणवीर यांनी केले आहे.