सोमनाथ येथे जिवतारा फाउंडेशनची स्वच्छता मोहीम-

मुल – प्रतिनिधी
मुल तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ सोमनाथ येथे दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी जिवतारा फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम सकाळी 9.30 ते 12.30 या वेळेत पार पडली.
या उपक्रमात एकूण 15 स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ करण्यासाठी उत्साहाने काम केले. मोहिमेदरम्यान अंदाजे 50 किलो कचरा जमा करण्यात आला तसेच 15 कचऱ्याच्या पिशव्या भरून परिसर स्वच्छ करण्यात आला.
या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन मॅकलवार, उपाध्यक्ष रोशन गोहने, कोषाध्यक्ष पंकज चौधरी, सहसचिव सतिश घोटेकर, सदस्य सुरज कांकलवार व प्रणित भोयर उपस्थित होते. तसेच माँटिन शेडमाके, सुजल गेडाम, नवनाथ मानकर, विदयुत मानकर, अंकुश चौधरी, राम घोटेकर, सौरभ पुडके, मयुर नायबनकार, वैभव चौधरी व इतर स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.
या मोहिमेद्वारे स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनतर्फे देण्यात आली.