वाघाच्या हल्ल्यात मारोडा येथील महिला ठार
आमटे फार्म सोमनाथ येथील घटना .
मुल – प्रतिनिधी
मूल दि. २८ फेबु
कापूस तोडणीचा हंगाम सुरु असल्याने .
सोमनाथ येथील आमटे फार्ममध्ये कापूस तोडण्यासाठी गेलेल्या मारोडा येथील एका महिलेला वाघाने ठार केल्याची दुर्दैवी घटना आज घडली. सुनीता शामराव भोयर (वय ४५, रा. मारोडा) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता भोयर या सकाळी इतर मजुरांसह शेतात कापूस तोडण्यासाठी गेल्या होत्या. शेताच्या कडेला असलेल्या झुडपातून अचानक वाघाने हल्ला केला. इतर मजुरांनी आरडाओरडा केल्यावर वाघ जंगलाच्या दिशेने पसार झाला; मात्र तोपर्यंत सुनीता भोयर यांचा जागीच मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी वनविभागाकडे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
मृत महिलेच्या पश्चात म्हातारे आई वडील कुटुंबीय असा परिवार आहे. शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.




