नवभारत विद्यालय मुल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा –
मुल – प्रतिनिधी
दिनांक 8 मार्च 2026 रोजी नवभारत विद्यालय, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय एम सी व्ही सी मूल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री छत्रपती बारसागडे सर होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सौ वर्षां नैताम मॅडम पोलिस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन मुल, सौ .रजनी झाडे मॅडम, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ भांडारकर मॅडम, जेष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी सर, प्रा. काटकर सर, प्रा. धोटे सर,प्रा. उगेमुगे मॅडम, प्रा.कार मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी सानिया पाल ,दीक्षा बनकर, वल्लरी पाल, अदिती उपरीकर,परी कोंतमवार,सिद्धी घुमलवार यांनी जागतिक महिला दिनावर भाषणे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका कु. माधुरी तलांडे मॅडम यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक सौ वर्षा नैताम मॅडम पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन मुल यांनी समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आणि महिलांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो असे प्रतिपादन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बारसागडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिला दिन म्हणजे फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर स्त्रीच्या संघर्षाची आठवण ठेवून, तिच्या हक्कांची व समानतेची जाणीव करून देणारा दिवस आहे. असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक निलेश माथनकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनिल चौधरी यांनी मानले. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.



