शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन .

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन .

मुल – प्रतिनिधी
औद्योगिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता युवक-युवतींनी रोजगाराभिमुख शिक्षणाचा लाभ घ्यावा आणि शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता मा. सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूल (आकापूर) येथे प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जे. व्ही. निंबार्ते यांनी केले आहे.
येथे ईलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 24 जागा, मेकॅनिक ईलेक्ट्रीक व्हेईकल-24 जागा, फिटर-20 जागा, मेकॅनिक मोटर व्हेईकल-24 जागा, वायरमन-20 जागा, मेकॅनिक डिझेल-24 जागा, वेल्डर-40 जागा, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक-20 जागा, फॅशन डिझाईन अॅन्ड टेक्नॉलॉजी-20 जागा असे विविध व्यवसायचे अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक प्रशिक्षण, अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात. शासनाच्या कौशल्य विकास धोरणानुसार विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिले जात असून उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार त्यांना सक्षम बनविण्यात येते.
यावर्षी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून दहावी, बारावी तसेच पदवीधर उत्तीर्ण पात्र विद्यार्थ्यानी दिनांक 21/06/2026 पर्यंत अर्ज सादर करून प्रवेशाची संधी साधावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयटीआयचे शिक्षण हे अल्प खर्चात रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी मा. सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल येथे संपर्क साधावा, असे आवाहनही प्राचार्य जे. व्ही. निंबार्ते यांनी केले आहे.

प्रवेश अर्ज भरण्या करिता वेबसाईट www.admission.dvet.gov.in वर जाऊन वर करावा.