देवनिल विद्यालयात विद्यार्थी मंत्रीमंडळाची स्थापना
विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित देवनिल विद्यालय टेकाडी येथे मुख्याध्यापक राजेश सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय शाळा उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना लोकशाही मुल्य आणि मतदान प्रक्रिया याविषयी माहिती व्हावी यादृष्टीने शैक्षणिक सत्र २५-२६ करीता इव्हिएम मोबाईल अपद्वारे मतदान प्रक्रिया घेऊन शालेय विद्यार्थी मंत्रीमंडळाची निवड करण्यात आली.
यात मुख्यमंत्री साहील मांदाडे, उपमुख्यमंत्री समृद्धी नागोसे, क्रीडामंत्री आनंद भोयर, सांस्कृतिक मंत्री आर्या जक्कुलवार, आरोग्य व स्वच्छतामंत्री लक्की नागोसे, संरक्षणमंत्री संदेश कावळे, अर्थमंत्री साई मस्कावार, पर्यावरणमंत्री चंद्रकांत बोरकर, नियोजनमंत्री समृद्धी देवगडे, शिक्षणमंत्री तमन्ना शेख, शालेय शिस्त व गुणवत्ता विकासमंत्री सिमरन उईके, विद्यार्थीनी प्रतिनिधी अर्चना गुरनुले, विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व मेश्राम,परीपाठ नियोजन प्रमुख राधिका चौधरी, आरोग्य प्रमुख ऋतुजा मोहुर्ले, दैनिक फलक लेखन प्रमुख संस्कृती पेंदोर,काजल उईके यांची निवड करण्यात येऊन शालेय मंत्रीमंडळाला शपथ देण्यात आली.
शालेय मंत्रीमंडळात निवडुन आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन मुख्याध्यापक राजेश सावरकर,निवडणुक प्रक्रिया प्रमुख नामदेव पिजदुरकर, संदीप धाबेकर यांनी मार्गदर्शन केले तर निवडणूक अधिकारी म्हणून मनोहर मडावी, गणेश श्रीरामे,सुशिला उडाण, वैशाली भांडेकर, अंकिता चहांदे, रविंद्र तुपकर, पुरुषोत्तम खोबे, आत्माराम सुरजागडे, विनोद मंगाम, सचिन कोल्हटवार,भुपेश भोयर यांनी सहकार्य केले.




