तळोधी बा. पोलीस स्टेशन मध्ये नवीन ठाणेदार रुजू

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर

तळोधी (बा.),दि.२६/०४/२०२३

तळोधी बा: येथील पोलीस स्टेशन ठाणेदार श्री. निलकंठ शेंडे यांची चंद्रपूर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांनी तळोधी बा. पोलीस स्टेशन मध्ये रुजू होऊन कार्यभार सांभाळला आहे. तळोधी बा. पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावातील कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि  अवैध दारू व अवैध रेती तस्करी करणाऱ्या तस्कराकडून नवीन ठाणेदार यांना आव्हान असून तस्करी करणाऱ्यांच्या  मुसक्या आवळणार का ?  असे प्रश्न नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.  यावेळी तळोधी बा. पोलीस स्टेशन च्या वतीने नवीन ठाणेदार मंगेश भोयर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व ठाणेदार निलकंठ शेंडे साहेबांना निरोप देण्यात आले.newsjagar