प्रेसनोट
गडचिरोली
कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंदचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती गडचिरोली च्या वतीने मा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मुलींचे शिक्षण थांबवायचे नसेल, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ द्यायचा नसेल व शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन द्यायचे नसेल तर कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये. मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नये, घराजवळची हक्काची शाळा बंद करू नये अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती गडचिरोली संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनातून केली आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नये यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत ठराव सोबत जोडले असल्याचेहीं निवेदनातून कळविले आहे
तेव्हा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष श्री पुंडलिक देशमुख, श्री राजन्ना बिट्टीवार सचिव, श्री अमरदीप भुरले कार्याध्यक्ष, श्री संजय मेश्राम, रविंद्र गावंडे, रघुपती मुरमाडे, गुरूदास सोमनकर, खुशाल भुरसे, वसंत मडावी, भगवान मडावी, महेश दहागावकर, हिराशिंग बोगा, तुळशीदास ठलाल, संतोष मेंदाळे, हेमंत दुर्गे,अंताराम पदा, कलीराम हलामी, तुळशीदास बांबोळे, दादाजी ओंडरे,मंगेश गावडे , विनोद झाडे, रवींद्र गावरे ,पुरणदास लोणारे,जिडिवार, रमेश कडेकरी श्रीकांत राऊत आदिनी केली आहे