सामाजिक कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाई च्या जयंतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना बुक व पेन वाटप

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

भेंडाळा,दि.०३/०१/२०२३

भारतातील प्रथम महिला शिक्षिका , देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन करणाऱ्या , दलित आणि स्त्रियांच्या हक्कासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माता सावित्री बाई फुले यांचा जयंती निमित्याने विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथे सामाजिक कार्यकर्ते प्रलय सहारे आणि आशिष रायपूरे यांचा कडून विध्यार्थ्यांना बुक व पेन वाटप करण्यात आले,सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांगे सर , तर पाहुणे म्हणून सुरपाम सर, जाधव सर बोरकर सर, श्रीरामे सर, झाडे सर ,धीरज गोहणे, शुभम दोहने , गाडेवार सर आणि सर्व पालक वर्ग उपथित होते.