संत निरंकारी मिशन तर्फे मार्कंडादेव नदी घाटात स्वच्छता अभियान संपन्न .

श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

चामोशी,दि.२८/०२/२०२३

संत निरंकारी मिशन चे सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज यांची जयंती तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ जल,स्वच्छ मन”या उपक्रमांतर्गत मार्कंडादेव येथील उत्तर वाहिनी वैनगंगा नदीच्या घाटाची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छ जल ,स्वच्छ मन या उपक्रमाच्या स्वच्छता अभियानाचे उद्घाटन सौ जयश्रीताई वायलालवार नगराध्यक्ष, नगरपंचायत चामोर्शी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी गडचिरोली क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक श्री हरीशजी निरंकारी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष चामोर्शी ब्रांच चे मुखी श्री अशोक बोरकुटे होते. विशेष अतिथी श्री लोमेश बुरांडे उपनगराध्यक्ष नगरपंचायत चामोर्शी जीवनकलाताई बोरकुटे मुखी आष्टी, खुशालराव झोडगे मुखी नांदगाव, श्री भोजराम लंजे निरंजना रामटेके श्री नामदेव गवारे फुलचंद गेडाम निकेश खोब्रागडे देवनाथ धोडरे उत्तम रोहनकार विद्या बोरकुटे होते.
संत निरंकारी मिशन जागतिक अध्यात्मिक चळवळ आहे जी मूल्यावर विश्वास ठेवते.मूल्य,सहिष्णुता, नम्रता, प्रेम आणि एकात्मता या विचारसरणीशी अनुसरण करून मानवतेची सेवा करते.मिशनला आध्यात्मिक आधार आहे आणि तो जात-पात, रंग पंथ किंवा धर्म यावर विश्वास ठेवत नाही. मिशन समाजाच्या उत्थानासाठी कार्य करते आणि भारतभर नियमितपणे सेवाभावी स्वरूपाचे अनेक उपक्रम आयोजित करते. स्वच्छ जल स्वच्छ मन या उपक्रमांतर्गत मार्कंडादेव येथील नदीघाट व नदीपात्रातील स्वच्छता करण्यात आली.या उपक्रमांतर्गत सेवेसाठी ब्रांच चामोर्शी, ब्रांच नांदगाव,ब्रँच आष्टी, ब्रांच लगाम येथील सेवादल व साथ-संगत मिळून जवळपास १५०० सेवार्थिनी सेवेचे योगदान दिले.स्वच्छता अभियान नंतर सर्वांसाठी लंगर वितरीत करण्यात आले. newsjagar
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल गवारे नाजूक येलमुले रवींद्र बुरांडे ईश्वर नवले मारुती काडीवार घनश्याम बोदलकर घनश्याम वासेकर श्री कडस्कर संभाजी भुरसे पियुष बोदलकर रामचंद्र मेश्राम नंदू रायसीडाम पंढरीनाथ पाल दीपक शेमले घनशाम दयालवार सुरेश चूधरी सुभाष ढाली वंदना धोडरे विठ्ठल पीठाले युवराज बोरकुटे इत्यादींनी सहकार्य केले.