देसाईगंज मधील गरजू लोकांचा शुभम पसारकर बनतोय आधार

श्री.भुवन भोंदे ,प्रतिनिधी,न्यूज जागर वडसा 

देसाईगंज,दि. २९/०५/२०२३

२७/०५/२०२३ रोज शनिवार पासून ते ३०/०६/२०२३ पर्यंत वडसा या शहरामधे बेघर ,बेवारस, निराधार , अनाथ, यांची दिव्यवंदना आधार फाऊंडेशन द्वारा शोध मोहीम राबविण्यात येत आहे, देसाईगंज वडसा मधील गरजू लोकांना आधार देण्यात आला व समाजामध्ये जगण्याचा अधिकार देण्यात आला . दिव्यवंदना आधार फाऊंडेशन चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात प्रथम येथील विविध भागात आढळून येणारे बेघर, बेवारस, भिक्षेकरी ,निराधार, अनाथ वृध्द, माता पिता लोकांशी आपुलकीने जपत आधार देणे त्यांचे वैद्यकीय उपचार करणे परिवाराचा शोध घेऊन परिवार मिलन करणे लोकांच्या पुनर्वसन करिता कार्य करीत आहे . आत्ता पर्यंत हजारोपेक्षा जास्त. बेघर , बेवारस , अनाथ , निराधार , लोकांना आधार व जीवनदान दिले असल्याने मदतीसाठी धाऊन येणारे देवदूत शुभम पसारकर अशी ओळख गडचिरोली व चंद्रपूर जील्ह्या मधे निर्माण झाली आहे. यामध्ये दिव्यवंदना आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष शुभम पसारकर तसेच त्यांची संपूर्ण टीम सुष्मा गलगले , सुप्रिया. कंकलवार, कांचन नीकोडे, प्रियंका पेटकर, लावण्या येलकुचेवार , नीलिमा धोडरे, दीक्षा अल्लुरी यांचा या शोध मोहीम मधे सहभाग होता . NewsJagar