श्री.भुवन भोंदे , प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि. २९/०५/२०२३
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस ५ जुनला साजरा होत असल्याने त्यांचे वाढदिवासाचे औचित्य साधून येत्या ४ जुनला देसाईगंज येथे गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी देसाईगंज येथे पत्रकार परिषदेत दिली.
दि. २९ मे २०२३ ला देसाईगंज येथे तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाध्यक्ष ब्राम्हणवाडे यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवासाचे औचित्य साधून एकदिवसा अगोदर म्हणजेच दि. ४ जुन २०२३ ला स्थानिक गजानन महाराज मंदिर माता वार्ड देसाईगंज येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने निराधार महिलांना शिलाई मशिनचे वाटप, स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी करीता विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप व करिअर मार्गदर्शन शिबीरचे आयोजन कण्यात आलेले आहे. News Jagar
या कार्यक्रमाला स्वतः प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले उपस्थित राहणार आहेत. तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीकरीता मार्गदर्शन करण्याकरीता फिनीक्स अकॅडमी वर्धाचे संचालक नितेश कराळे यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच कार्यक्रमाला माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके हे विशेष अतिथी म्हणून येणार आहे. तर विधानपरिषदेचे आ. सुधाकर अडवाले यांचा सुद्धा यादरम्यान सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ब्राम्हणवाडे यांनी दिली.
पत्रकार परिषदेला माजी आ. आनंदराव गेडाम, जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी, प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव डॉ. नितीन कोडवते, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, उपाध्यक्ष नितीन राऊत, संजय कराकर, माजी तालुका अध्यक्ष परसराम टिकले, माजी नगरसेवक गणेश फाफट, जिल्हा सरचिटणीस नरेंद्र गजपुरे, आरमोरी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, अनु. जाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष पंकज चहांदे, शहरध्यक्ष विक्की डांगे, उपाध्यक्ष विजय पिल्लेवान, युकाँचे माजी शहरअध्यक्ष पिंकु बावणे, महेंद्र खरकाटे, तालुका महिला अध्यक्ष आरती लहरी, रूपलता बोदले, रजनी आत्राम, आदिवासी काँग्रेस तालुकाध्यक्षा जयमाला पेंदाम, विमल मेश्राम, माजी नगरसेविका निलोफर शेख, सर्वेश्वर मेश्राम, भुमेश्वर सिंगाडे, हरिदास बगमारे, मनोहर निमजे, रूपेश टिकले, विलास बन्सोड, कमलेश बारस्कर, खेमराज खेकारे, सुमित झिलपे, राजकुमार मेश्राम, चेतन मेंढे, ओमकार कामथे, बंडूभाऊ म्हैसकर, हरिदास बगमारे, आदी उपस्थित होते.
२ जुन पर्यंत करा शिलाई मशिन व पुस्तकाकरीता नोंदणी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक गजानन महाराज मंदिर येथे निराधार महिलांना शिलाई मशिनचे वाटप व स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी करीता विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप व करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. गरजू महिलांनी आवश्यक कागपत्रांसह तालुकाध्यक्षांकडे संपर्क करावे. तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकरीता लागणारे आवश्यक पुस्तकांकरीता येत्या २ जुन पर्यंत मोबाईलवरील लिंग मध्ये नाव समाविष्ट करून घ्यावे.
लाभ घेणाऱ्यांना उपस्थित राहणारे आवश्यक
ज्या विद्यार्थ्यांनी किंवा गरजू महिलांना कागदपत्र पुर्ततेनंतर लाभ मिळणार आहे अश्या विद्यार्थी व महिलांनी कार्यक्रमा दरम्यान उपस्थित राहणे आवश्यक आहे. नोंदणी केली किंवा तालुकाध्यक्षांकडे कागदपत्र सादर केले म्हणून त्यांना ते साहित्य मिळेल या भ्रमात न राहता सरळ कार्यक्रमा दरम्यान उपस्थित राहणे आवश्यक आहे.



