भेजगांव येथे उमेदच्या वतीने प्रोढशिक्षण कार्यशाळा
मूल : तालुक्यातील भेजगांव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत अभिसरण सार्वत्रिकरण प्रकल्पाच्या वतीने एक दिवसीय प्रौढ शिक्षण कार्यशाळा ग्रामपंचायत जुनासरला येथे गुरुवारी (९) घेण्यात आली.
या कार्यशाळेचे अध्यक्ष भेजगांव येथील ग्रामविकास अधिकारी उमेश आकुलवार तर प्रमुख अतिथी म्हणून, पोलीस पाटील शशिकांत गणवीर, जि प शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश निमगडे, कुटुंबश्री एनाआरओ प्रसन्ना विके, अंगणवाडी सेविका निमाताई शेन्डे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदराव चटारे, राजु कोसरे, विवेकानंद उराडे, जलिद मोहुर्ले उपस्थित होते.
या कार्यशाळेत गावातील निरक्षर महिलांनी सहभाग नोंदविला. महिलांना प्रोढ शिक्षणाचे महत्त्व समजून सांगत प्रौढ शिक्षणावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच निरक्षर महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने निरक्षर महिलांना बुक व पेन वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी संचालन सारीका बावने तर प्रास्ताविक प्रसन्ना विके आभार दिप्ती वाढई हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाग संघाच्या अध्यक्षा विशाखा गणवीर, एनी सय्यद,जयश्री चौधरी, ज्योती वाढई आदींनी परिश्रम घेतले.