शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी चे विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये चमकले.
ब्रह्मपुरी: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई प्रायोजित राज्यस्तरीय “तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धा” पद्मश्री डॉ. व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे नुकत्याच पार पडल्या. सदर स्पर्धा अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी होत्या. यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी संस्थेच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी गौरव आडे आणि अजित दोनाडकर यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे. त्यांना प्रा.शरद दांडगे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशासाठी डॉ. राजन वानखडे, प्र.प्राचार्य, प्रा.राजेंद्र राचलवार उपप्राचार्य, डॉ. आशिष बहेंडवार, जिमखाना उपाध्यक्ष, विभागप्रमुख प्रा.माधुरी नागदेवे, प्रा. जयंत बोरकर, प्रा. शालिनी खरकाटे, प्रा.हस्तीमल कुमावत, प्रा. नितीन डोरलीकर, प्रबंधक श्री. धीरजशहा मडावी आणि सर्व अधिव्याख्याता व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.