महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा मुल च्या वतीने – प्रा. महेश पानसे सर यांचा सत्कार .
मुल- धर्मेंद्र सुत्रपवार
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई ही राज्यातील अग्रगण्य संघटना असून संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचे चा विस्तार आहे.अग्रगण्य संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी मा.प्रा.महेश पानसे सर यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक संघटक मा.संजयजी भोकरे यांच्या शिफारशीनुसार राज्य कार्यकारिणीने नुकताच झालेल्या राज्य कार्यकारिणी सभेत घोषणा करण्यात आली.
मा.प्रा महेश पानसे सर यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा मुल च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला , याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा मुल चे अध्यक्ष श्री सतीश राजुरवार , श्री राजेन्द्र वाढई सचिव, श्री राजेन्द्र सुत्रपवार सदस्य, श्री जितेन्द्र बोरकर सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते .