देवनिल विद्यालय टेकाडी येथे जिल्हास्तरीय लोकनृत्य लावणी स्पर्धा .
प्रतिनिधी – धर्मेंद्र सुत्रपवार
विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित देवनिल विद्यालय टेकाडी येथे संस्थेच्या उपाध्यक्षा स्व.निलिमाताई भांडेकर यांच्या चौदाव्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय लोकनृत्य लावणी स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक गटात घेण्यात आली.
स्पर्धेचा विषय महाराष्ट्राची संस्कृती जोपासणारा लोकनृत्य लावणी होता लावणी म्हणजे महाराष्ट्रातील पारंपरिक गाणे आणि नृत्य यांचा संगम होय .या स्पर्धेत दोन्ही गटात जिल्ह्यातील एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला.प्राथमिक गटात घेण्यात आलेल्या लावणी नृत्य स्पर्धेत प्रथम गुंजन धिरज चौधरी क्रिस्टल काव्हेंट मुल, द्वितीय स्वरा भोजराज मुनघाटे सुभाष प्राथमिक शाळा मुल, तृतीय रुबीना परशुराम मानकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिमढा, आणि माध्यमिक गटात प्रथम सानिया देवाजी बावणे भय्याजी पा.भांडेकर कनिष्ठ महाविद्यालय कापसी, द्वितीय खुशी पत्रुजी सोनुले नवभारत विद्यालय मुल , तृतीय उन्नती माणिक उंदीरवाडे प्रविणभाऊ आडेपवार विद्यालय निपंद्रा यांनी प्राप्त केला. याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांसह ,माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी प्रथम गुंजन कैलास अलोने, द्वितीय श्रृतिका अशोक आवळे ,दिक्षा हितेश जेंगठे,सौरव प्रविण मोहुर्ले आणि मोहीम जितेंद्र शेंडे यांनाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
समारोपिय आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार देवरावजी भांडेकर अध्यक्ष विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मुल हे होते, बक्षीस वितरक म्हणून संस्थेचे सचिव डॉ.महेश भांडेकर तर अतिथी रमेश भांडेकर, मुख्याध्यापक राजेश सावरकर, प्राचार्य रमेश मंडलवार, मुख्याध्यापक येनुरकर,प्रा.मोना गहाणे,परीक्षक अविनाश पाल, सारीका वासेकर,स्नेहा नागुलवार, अश्विनी तुपकर आदिंची उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश सावरकर तर संचालन गणेश श्रीरामे आणि आभारप्रदर्शन वैशाली भांडेकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंबादास राजनकर, नामदेव पिजदुरकर, संदीप धाबेकर, मनोहर मडावी,सुशिला उडाण, रविंद्र तुपकर, पुरुषोत्तम खोबे, आत्माराम सुरजागडे, विनोद मंगाम, सचिन कोल्हटकर,भुपेश भोयर यांच्या सह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.