यशस्वी महिला प्रभाग संघ जिल्ह्यात अव्वल

यशस्वी महिला प्रभाग संघ जिल्ह्यात अव्वल
पालकमंत्र्याचे हस्ते सत्कार

मूल : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला विविध उद्योग उभारत आत्मनिर्भर होत आहेत. याच माध्यमातून विविध व्यावसायिक उपक्रम राबवित असल्याने मूल तालुक्यातील यशस्वी महिला प्रभाग संघ चिरोली या प्रभागसंघ जिल्ह्यातून अव्वल आला असून उत्कृष्ट प्रभाग संघ म्हणून पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी प्रभाग संघाच्या वतीने अध्यक्ष सौ विशाखा गणवीर तर सचिव सोनी उराडे यांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र घेत सत्कार स्वीकारला.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहायता समूहातील उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री तसेच जिल्हास्तरीय हिराई महोत्सव व मिनी सरस प्रदर्शन कार्यक्रमात सोमवारी चांदा क्लब ग्राउंड वर सत्कार कार्यक्रम पार पडला.
यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधाकर आडबले, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे ,करण देवतळे, जिल्हाधिकारी विनायक गोंडा जी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, प्रकल्प संचालक गिरीश धायगुडे आदी सह अधिकारी उपस्थित होते.
यशस्वी महिला प्रभाग संघाच्या यशस्वी ते करिता विविध उपक्रम योजनाची अंमलबजावणी करण्याकरिता तालुका अभियान व्यवस्थापक नितीन वाघमारे, एसआयबी संतोष वाढई, प्रभाग समन्वयक रुपेश आदे, मनिष मोहुर्ले, कृषी समन्वयक स्नेहल मडावी, जयश्री कामडी, मंजु कामडी, प्रभाग व्यवस्थापक भावना कुमरे, स्वाती आयलनवार आदींसह प्रभाग संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.